Answer :

i have sent a compo in d pic

■■ माझे वडील■■

माझे वडील म्हणजेच माझे बाबा माझ्यासाठी सर्वस्व आहेत. ते माझ्यासाठी खूप खास आहेत. मी त्यांना माझ्या सगळ्यात चांगल्या मित्रासारखे मानते. त्यांचे मत व विचारांचे मी खूप आदर करते.

माझ्या बाबांचे नाव विक्रम सिंह आहे.बाबा रोज सकाळी लवकर उठतात.सकाळी व्यायाम करतात.त्यानंतर ते कामाला जातात.

ऑफिसमध्ये ते खूप मेहनत करतात.संध्याकाळी घरी येताना,ते आमच्यासाठी खाऊ आणतात. घरी आल्यावर,माझ्याशी गप्पा मारतात.मला कधी कधी बाहेर फिरायला घेऊन जातात.

माझ्या बाबांना नीटनेटकेपणा फार आवडतो.आम्ही गबाळेपणाने वागलो,तर त्यांना राग येतो.ते अभ्यासात माझी मदत करतात.ते नेहमी मला नवीन गोष्टी शिकण्यासाठी प्रोत्साहन देत असतात,माझा आत्मविश्वास वाढवतात.

ते माझे फार लाड करतात.अधूनमधून ते आम्हाला ऑफिस मधल्या गमती सांगतात.कधी कधी कामानिमित्त त्यांना बाहेरगावी जावे लागते,तेव्हा मला त्यांची खूप आठवण येते.माझे बाबा मला खूप खूप आवडतात.

Other Questions